Ad will apear here
Next
‘आपत्ती व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व’
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आपत्ती व्यवस्थापनाच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण.रत्नागिरी : ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५मध्ये आला, ज्यामध्ये कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे,’ असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार येथे आपत्ती व्यवस्थापनाच्या चित्ररथाचे जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, रत्नागिरीचे प्रांतधिकारी अमित शेडगे, चिपळूणच्या प्रांतधिकारी कल्पना जगताप, खेडचे प्रांतधिकारी श्री. सोणाने, रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, नैसर्गिक आपत्तीचे अजय सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ‘आपत्ती ही दोन प्रकारची असते. एक मानवनिर्मित आणि दुसरी नैसर्गिक आपत्ती. या दोन्ही प्रसंगी नागरिकांनी कसे राहिले पाहिजे, दैनंदिन जीवनात वागण्यात कोणत्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत, या प्रसंगी विचलित न होता दुसऱ्याला मदत कशी केली पाहिजे याबाबत चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला लोकशिक्षण आपत्ती व्यवस्थानाच्या या उपक्रमातून देण्यात येणार आहे. चित्ररथ नऊ ते १७ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात दाखविण्यात येणार आहे.

‘घरामध्ये गॅस लिकेजमुळे आग लागणे, भुंकप, दरडी कोसळणे यांसारख्या आपत्तींवर आपण आपल्या वागण्यात काही गोष्टी अंगिकारल्या, तर मात करू शकतो. आपल्या गावामध्ये वाहनचालक, उत्कृष्ट पोहणारी व्यक्ती अशा लोकांची एक यादी तयार असणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा लोकांच्या मदतीने आलेल्या आपत्तीवर आपण मात करू शकतो. याआधीही जिल्ह्यात बऱ्याच आपत्ती आल्या: परंतु आपण सर्वांनी एकोपाने त्याला सामोरे गेलो आहोत, यापुढेही अशाप्रकारच्या आपत्तींना आपण एकोपाने सामोरे जाऊ,’ असा विश्वास जिल्हाधिकारी या वेळी व्यक्त केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZSUBT
Similar Posts
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निःशुल्क हेल्पलाइन; ध्वनिसंदेशांद्वारे माहिती रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, तसेच आपत्ती व्यव्यस्थापन विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना, शेती-पशुपालनाची तांत्रिक माहिती, सामाजिक उपक्रम, रोजगार आदींसह अन्य आवश्यक माहिती ध्वनिसंदेशामार्फत देण्याचा उपक्रम नुकताच सुरू झाला. रिलायन्स फाउंडेशन माहिती
‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’ रत्नागिरी : ‘दिव्यांग बांधव शारीरिक व्याधींवर मात करून समाजात जगत असतात. त्यामुळे आपण सर्व जण समाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
भाट्ये किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट दाखल रत्नागिरी : तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस एच १९८’ हे हॉवरक्राफ्ट देशाच्या पश्चिम किनार्‍यावर गस्त घालत असताना १० जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर दाखल झाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ११ जानेवारीला सकाळी या हॉवरक्राफ्टच्या कार्यप्रणालीची पाहणी करून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला
रत्नागिरीत ‘ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन रत्नागिरी : ग्रंथालय संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे २९ व ३० डिसेंबर या कालावधीत ‘रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे हा ग्रंथोत्सव होईल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language